Home Breaking News नगरपरिषद निवडणूक कळमेश्वर व मोहपामध्ये आरक्षण सोडतीनंतर राजकारण तापलं, उमेदवारांची धावपळ सुरू

नगरपरिषद निवडणूक कळमेश्वर व मोहपामध्ये आरक्षण सोडतीनंतर राजकारण तापलं, उमेदवारांची धावपळ सुरू

112
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर ब्राह्मणी नगराध्यक्ष पद अनुसूचित जातींसाठी आणि मोहपा नगरपरिषद नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. बुधवारी ६ ऑक्टोबर रोजी दोन्ही नगरपरिषद क्षेत्रांतील प्रभाग आरक्षणाची सोडत निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित नगरपरिषद मुख्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली.
या आरक्षण प्रक्रियेनंतर दोन्ही शहरांमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून इच्छुक उमेदवारांनी प्रचाराच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

कळमेश्वर नगरपरिषद अनुसूचित जातीसाठी आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे –
काँग्रेस: सरजू मंडपे
भाजप: देविदास भगत, शेखर वैद्य, अविनाश माकोडे
शिवसेना (शिंदे गट): बिरजू रघुवंशी

मोहपा नगरपरिषद – नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार –
काँग्रेस: प्रदीप गणोरकर, माधव चर्जन, राजू निरंकर
भाजप: श्रीकांत येनुरकर, प्रवीण श्रोते, राहुल अंजनकर, इमेश्वर यावलकर
शिवसेना (उद्धव गट): विजय वानखेडे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): हरिओम निरंकर

प्रभाग आरक्षण निश्चित झाल्याने आता इच्छुकांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांत गट-तट व अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष उमेदवारी घोषित होणार असून राजकीय रंगत वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here