Home Breaking News महासम्राट बळीराजा रथयात्रा २०२५” चा समारोप समारंभ उद्या शिवतीर्थ टुरिझम, उमरी येथे...

महासम्राट बळीराजा रथयात्रा २०२५” चा समारोप समारंभ उद्या शिवतीर्थ टुरिझम, उमरी येथे भव्य आयोजन

76
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
शेतकरी,युवक आणि ग्रामीण समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली “महासम्राट बळीराजा रथयात्रा २०२५” ही ऐतिहासिक यात्रा दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती) येथून उत्साहात प्रारंभ झाली.
ही यात्रा शिवतीर्थ टुरिझमचे संस्थापक डॉ. अभीविलास नखाते यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली असून, तिचा समारोप समारंभ उद्या, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्थ टुरिझम परिसर, उमरी (ता. सावनेर, जि. नागपूर) येथे पार पडणार आहे.
या समारोप सोहळ्यात विविध सामाजिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन व बळीराजांच्या सन्मानार्थ विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघाच्या वतीने सर्व नागरिकांना या समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here