गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी कळमेश्वर येथे झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात भाजपच्या ‘आयारामां’वर उपरोधिक भाषेत टीका केली. त्यांनी म्हटले की, “पक्षातील जुने कार्यकर्ते हे आता ‘घर की मुर्गी दाल बराबर’ झाले आहेत, आणि तुम्हाला बाहेरचा सावजीचा ‘चिकन मसाला’ चांगला लागतो.”
हा सोहळा लेव्हल क्रॉसिंग क्रमांक २८९ वरील रेल्वे उड्डाणपूल तसेच वन टाइम इम्प्रूव्हमेंट अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणा प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी आयोजित केला होता. यावेळी गडकरी यांनी कळमेश्वर तालुक्यातील भाजपच्या सध्याच्या स्थितीवरही उपरोधिक टोला लगावला.
दरम्यान, या परिस्थितीतून मार्ग काढत कळमेश्वर नगरपरिषद व मोहपा नगरपरिषद यांची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे कळमेश्वर शहराध्यक्ष प्रतिक कोल्हे आणि मोहपा शहराध्यक्ष निळकंठ तपासे आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी सादर करतात, याकडे संपूर्ण प्रभागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात सध्या या दोन्ही नगरपरिषद क्षेत्रांतील भाजपच्या रणनीतीबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.
Home Breaking News कळमेश्वर-मोहपा नगर परिषद निवडणूक तापली! गडकरींचा टोला आणि कोल्हे – तपासे यांचे...




