गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथे २१ सप्टेंबर २०२५ हा दिवस मातोश्री वृद्धाश्रमासाठी खास ठरला. वृद्धाश्रमातील निवासी ज्येष्ठांच्या सोयीसाठी डॉ.राजीव पोतदार,सौ.वर्षाताई पोतदार व चि. निषाद राजीव पोतदार यांच्या सौजन्याने ३१ पलंग, गाद्या व उशांचा संच अर्पण करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे (काटोल)जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, रामराव मोहाडे,संदीप उपाध्य, दिलीप धोटे, इमेश्वर यावलकरसह अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सामाजिक कार्यामुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांना अधिक सोयीस्कर व आरामदायी सुविधा उपलब्ध होणार आहेत. पोतदार परिवाराच्या या उदात्त योगदानाबद्दल वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




