Home Breaking News तेलकामठी महसूल मंडळात मुसळधार पावसामुळे व वेगवान वाऱ्यामुळे झालेल्या पिक नुकसानीची माहिती...

तेलकामठी महसूल मंडळात मुसळधार पावसामुळे व वेगवान वाऱ्यामुळे झालेल्या पिक नुकसानीची माहिती मिळताच कळमेश्वर येथील तहसीलदार विकास बिक्कड यांनी दिले पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश

89
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी महसूल मंडळामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या कपाशी पिकासह इतर पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. पावसाच्या आणि वाऱ्याच्या जोरामुळे कपाशीची पीक आडवं पडलं असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता तेलकामठी महसूल मंडळात दिसून येत आहे.तर मंडळातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याची मागणी शासनाला केली आहे.
याविषयी तहसीलदार कळमेश्वर विकास बिक्कड यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,मला माहिती मिळताच मी महसूल मंडळ अधिकारी यांना पाहणी करण्यास नुकसानग्रस्त भागात रात्रीच पाठवले असुन झालेल्या नुकसानीची पंचनामे दिनांक २१ सप्टेंबर २०२५ पासून तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांना वाटून दिलेल्या गावाप्रमाणे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here