गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी )
कळमेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी दि. २२ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. या सोडतीच्या सरपंच पदाचा कार्यकाळ २०२५ ते २०३० असा असणार आहे, अशी माहिती तहसीलदार रोशन मकवाने यांनी दिली.
कळमेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये या गावांमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी दुपारी १ वाजता पासून कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक नागरिकांनी या विशेष सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन कळमेश्वर तहसीलच्या तहसीलदार रोशन मकवाने यांनी केले आहे.
Home कळमेश्वर तालुका विशेष २२ एप्रिल ला ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत – श्रीमती रोशनी मकवाने...




