Home राजकीय कळमेश्वर व मोहपा नगरपरिषद निवडणुका – शिवसेनेची दोन्हीकडे मजबूत उपस्थिती – तिरंगी...

कळमेश्वर व मोहपा नगरपरिषद निवडणुका – शिवसेनेची दोन्हीकडे मजबूत उपस्थिती – तिरंगी लढतीकडे मतदारांचे लक्ष

122
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत अधिकच उत्कंठावर्धक बनत असून मतदारांमध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष ब्रिजलाल रघुवंशी यांच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माकोडे आणि काँग्रेसच्या जोत्सना सरजु मंडपे यांच्यासाठी स्पर्धा अधिक कठीण बनत असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे. तिन्ही उमेदवारांनी प्रचारात वेग घेतल्याने कळमेश्वरची राजकीय तापमानपातळी चांगलीच वाढली आहे.
मोहपा नगरपरिषद निवडणुकीतही तितकीच चुरस पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय वानखडे यांनी प्रचारात जोरदार सुरुवात केल्यानंतर भाजपाचे प्रवीण श्रोते आणि काँग्रेसचे माधव चर्चा यांना टक्कर मिळत असल्याचे मतदारांत चर्चिले जात आहे. रिंगणातील तिन्ही प्रमुख उमेदवार आपापल्या विकासाच्या अजेंड्यावर मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दोन्ही नगरपरिषदांमधील तिरंगी लढतीमुळे अंतिम क्षणापर्यंत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यातील प्रचारानंतर मतदार कोणाला पाठिंबा देतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here