Home अन्न व पुरवठा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत धान्याचा लाभ घेणाऱ्यांची अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविणेबाबत

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत धान्याचा लाभ घेणाऱ्यांची अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविणेबाबत

103
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत धान्याचा लाभ घेणाऱ्यांची अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी सूचित केलेले आहे. तसेच तालुक्यातील नविन शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करणेकरिता अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करून खरे गरजू लाभार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकतील यासाठी हि कारवाई केली जात असल्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावपातळीवरील रास्त भाव दुकानदाराला तत्यांच्या दुकानास जोडलेल्या अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविताना खालील कारवाई करण्यात यावी :-
1) संबंधित रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी.
2) फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक बाबत पावती, बैंक पासबुक, विजेचे देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन ईतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रति घ्याव्यात. दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसावा.
3) शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना/प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्याअनुषंगाने शासन निर्णय दि. 17/07/2013 आणि दि. 17/12/2013 मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करणेबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे.
करिता तालुक्यातील सर्व जनतेने या कामास तत्परतेने योग्य ते प्रतिसाद द्यावे अश्या प्रकारचे आवाहन तहसिलदार कळमेश्वर यांच्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here