मौदा
नगर पंचायत मौदा हद्दीत प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. एकदाच वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक. यात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, स्ट्रॉ, कप, प्लेट्स, इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. अशा प्लास्टिकच्या वस्तू ज्या एकदाच वापरल्या जातात आणि त्यानंतर फेकून दिल्या जातात. या वस्तू पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहेत. कारण त्या लवकर कुजत नाहीत आणि त्यांचे विघटन होण्यास खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे मौदा हद्दीत कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांनी जाहीर सुचनेद्वारे दिला आहे. सर्व नागरिकांनी, व्यावसायिकांनी आणि संघटनांनी सहकार्य करण्याचे व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांनी केले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मौदा चे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक बंदी बाबत चर्चा केली यावर त्यांनी सकारात्मक विचार करून प्लास्टिक बंदी बाबत दि. १८ जुन रोजी जाहीर सूचना काढली आहे. त्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांचे आभार मानले व या अभियानाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तुकाराम लुटे, दिनेश ढोबळे, देवेंद्र सोनटक्के, ईश्वर पत्रे, सुनिल ठाकरे, गुलाब तुरणकर, वसंता पत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम –
पर्यावरणाचे प्रदूषण –
सिंगल यूज प्लास्टिकमुळे जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित होते. यामुळे जलचरांना आणि वन्यजीवांना धोका निर्माण होतो.
प्लास्टिक कचरा –
सिंगल यूज प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो, ज्याची विल्हेवाट लावणे खूप कठीण आहे.
आरोग्यावर परिणाम –
प्लास्टिकच्या बाटल्यांमधून हानिकारक रसायने अन्नामध्ये मिसळू शकतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
खर्चिक –
सिंगल यूज प्लास्टिकच्या कचरा व्यवस्थापनावर खूप जास्त खर्च येतो.सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करावे.प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांऐवजी कापडी पिशव्या आणि पुन्हा वापरता येतील अशा बाटल्यांचा वापर करावा.
स्ट्रॉ, चमचे, काटे इत्यादींचा वापर टाळावा.
खरेदी करताना कमीत कमी प्लास्टिक पॅकिंग असलेल्या वस्तूंची निवड करावी.
प्लास्टिक कचरा योग्य प्रकारे वेगळा करून पुनर्वापरासाठी द्यावा.
सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराऐवजी पर्यावरणास अनुकूल वस्तूंचा वापर करणे आवश्यक आहे.
Home Breaking News प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई – डॉ. विवेक मेश्राम (मुख्याधिकारी)




