श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे या उर्स मध्ये असंख्य भाविक बाबांच्या दर्शनाकरिता येतात राष्ट्रीय एकाता अखंडता याचे प्रतीक श्री बाबा ताजुद्दीन औलिया यांनी आपल्या जीवनातील १२ वर्षाच्या जीवनकाळ वाकी येथे घालविला त्यांच्या चरण स्पर्शाने वाकी नगरी पावन झालेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 3 सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता प.पू.श्री काशिनाथ नाना डहाके पाटील यांच्या वाकी गावातील निवासस्थानातून (वाडा) संदल निघेल व तो वाकी गावाला गस्त करून सायंकाळी ६.०० वाजता वाकी दरबार येथे पोहोचेल परंपरेनुसार सज्जादा नशीन श्री ज्ञानेश्वरराव डाहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन होईल त्यानंतर बाबांना चादर चढवण्यात येईल व उर्सला प्रारंभ होईल त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल रात्री ८.०० वाजता मिलाद व कव्वालीच्या कार्यक्रम होईल दिनांक ४ सप्टेंबरला सकाळी १०.०० वाजता कुल शरीफ चा कार्यक्रम होऊन उर्सची समाप्ती होईल या उर्स कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबांचा आशीर्वाद घ्यावा असे आव्हान श्री बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जादा नशीन श्री प्रभाकरजी डाहाके पाटील यांनी केले आहे.




