सावनेर
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस रूपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
ही जाहीर सभा दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता सावनेर येथील नेहरू मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित केली आहे.
नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून, मोठ्या संख्येने पक्षकार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




