Home Breaking News विद्यार्थ्यांच्या सेवेत ‘आप’! – पंकज घाटोडे यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील शाळकरी मुलांसाठी...

विद्यार्थ्यांच्या सेवेत ‘आप’! – पंकज घाटोडे यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील शाळकरी मुलांसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी

130
0

सावनेर/कळमेश्वर
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय बससेवा मिळावी यासाठी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सावनेर बस आगार आणि कळमेश्वर बस स्थानक येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी तालुका व जिल्हा पातळीवरील शाळांमध्ये शिक्षणासाठी दररोज प्रवास करतात. मात्र बससेवेअभावी त्यांच्या शिक्षणात अडथळे येतात. ही बाब लक्षात घेता, शाळा सुरू होण्याच्या आधीच गावागावातल्या विद्यार्थ्यांसाठी नियोजन करून शासकीय बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ‘आप’तर्फे करण्यात आली.
पंकज घाटोडे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची पायाभूत सुविधा ही सरकारची जबाबदारी आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी आम्ही सातत्याने मांडत राहू.”
यावेळी आम आदमी पार्टी चे पदाधिकारी जामुवंत वारकरी, संजय टेंभेकर, संजय राऊत, गजुभाऊ चौधरी आणि दिनेश मछले उपस्थित होते.
‘आप’ पक्षाने ग्रामीण विद्यार्थ्यांचा आवाज बनत प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here