Home Breaking News सावनेर मध्ये आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद संपन्न

सावनेर मध्ये आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद संपन्न

64
0

सावनेर तालुका प्रतिनिधी
सावनेर येथील कामाक्षी सेलिब्रेशन येथे आज दुपारी 1 वाजता आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.या परिषदेमध्ये पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची घोषणा केली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, प्रदेश सचिव सुनील वडसकर, शाहीदअली जाफरी, जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे, जिल्हा महासचिव जमुवंत वारकरी, ज्येष्ठ नेते संजय टेंभेकर, तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे आणि शहराध्यक्ष गजु चौधरी प्रमुख उपस्थित होते.
सावनेर तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका लढवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी सावनेर नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या महिलांची नावेही जाहीर करण्यात आली:
1.अनीता रमेश धानवले
2.प्रमिला संजय टेंभेकर
3.ज्योती कालिदास बुधोलिया
4.अश्विनी पंकज घाटोडे कार्यकारिणीच्या म्हणण्यानुसार, अजूनही काही नावे विचाराधीन असून, सर्व उमेदवारांची सखोल पडताळणी झाल्यानंतर अंतिम यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
घोषित केलेले नऊ महत्त्वाचे विकास मुद्दे
1. सोलार प्रकल्प व वीज बिलात घट
2. शाळांचे आधुनिकीकरण व गुणवत्तापूर्ण शिक्षण
3. पाण्याच्या टाक्यांचे नुतनीकरण व आधुनिक वॉटर फिल्टर प्लांट
4. स्पर्धा परीक्षार्थी व वयोवृद्धांसाठी आधुनिक वाचनालय
5. 60 वर्षांवरील नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
6. युवकांसाठी रोजगार शिबिरे व बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व्यवस्था
7. रोजगार निर्मितीसाठी नवीन कॉम्प्लेक्स उभारणी
8. रस्ते, नाले, बागा आणि मैदानांचे सौंदर्यीकरण
9. नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक आणि प्रामाणिक स्थानिक प्रशासन
हे मुद्दे पक्षाने स्पष्ट केले आहे.तर सावनेरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून प्रत्येक निर्णयात नागरिकांचा सहभाग आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय असेल असे पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here