Home Breaking News आदर्श शालेय शिक्षण प्रणालीच उत्कृष्ट दर्जाचे “सावनेर पॅटर्न” तयार करू:-आमदार डॉ. आशिषराव...

आदर्श शालेय शिक्षण प्रणालीच उत्कृष्ट दर्जाचे “सावनेर पॅटर्न” तयार करू:-आमदार डॉ. आशिषराव देशमुख

133
0

अतिशय वेगाने बदलणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षण व्यवस्थेत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी भविष्य हित केंद्रीत करून नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांचा एकंदरीत दर्जा उंचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना तयार करून ती यशस्वीरित्या राबविण्याबाबतचे निर्देश आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सावनेर तालुक्यातील खापा येथे आयोजित सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासंदर्भातील राधाकृष्ण हॉल खापा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मागर्दशन करतांना आमदार डॉ. आशिषराव देशमुख हयांना आदर्श शालेय शिक्षण प्रणालीचं महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट असं “सावनेर पॅटर्न” तयार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हया शैक्षणिक कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे, माझी माउली फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख यांचं “Model School” संबधी केलेलं PPT सादरीकरण, ज्यामध्ये त्यांनी खापा नगर परिषदेच्या सर्व शाळांमधील माझी माउली फाउंडेशनच्या “आदर्श शाळा अभियान” अंतर्गत केलेल्या विकास कार्यासोबतच, सर्व शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची एक विस्तृत रूपरेषा अतिशय मार्मीकपणे सादर केली. ज्यामध्ये शाळेतील भौतिक सोयी सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, नैतिक मूल्यसंवर्धन, खेळ संस्कृती, सामाजिक सहभागिता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय पोषण, विद्यार्थी आरोग्य व स्वच्छता इत्यादी विषयांवर वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना फक्त शिक्षित नव्हे तर योग्य, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनवून शिक्षणातून समाजोन्नतीचं उद्दिष्ट साध्य करावं, असे विचार डॉ. आयुश्री देशमुख यांनी व्यक्त केले.

क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी जि. प. व न.प. शाळांमधील व्यवस्था दर्जेदार करण्यासंदर्भात लक्ष केंद्रित केल्याने खापा शहरातील नागरिकांकडून त्यांचे मनपुर्वक अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद नागपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी, उपजिल्हाधिकारी श्री प्रविण माहिरे, सह आयुक्त नगर पालिका प्रशासन नागपुर श्री विनोद जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री मनोहर कुंभारे, अरविंद इण्डो पब्लिक स्कूल अमरावतीच्या मुख्याध्यापिका सौ. विजया बागदेव, उपविभागीय अधिकारी श्री संपत खलाटे, सावनेर चे मुख्यअधिकारी श्रीमती बगडे मॅडम, खापा नगर परिषदचे मुख्य अधिकारी श्री धनंजय सरनाईक, कळमेश्वर नगर परिषदचे श्री आकाश सुरडकर तसेच दोन्ही तालुक्यातील गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, केन्द्र प्रमुख व सर्व मुख्याध्यापक व खापा शहरातील प्रफुल्ल मोहटे, खेमराज बारापात्रे, अमोल भूते, पियुष बुरडे, राजेंद्र बुरडे, पवन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख श्री वाहाणे व आभार प्रदर्शन मुख्याधिकारी न. प. खापा श्री सरनाईक यांनी केले. श्री नेहारे सर, श्री मेश्राम सर, श्री खडसे सर, सौ मोंडे मॅडम व इतर शिक्षकानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here