सावनेर
नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली गोपाल घटे तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा दि.30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता नेहरू मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संपन्न झाली.
सभेला स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला. उमेदवार वैशाली घटे यांनी सावनेरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासन देण्याचे आश्वासन दिले.
रूपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सबलीकरणासाठी तसेच नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे सांगितले. सावनेरच्या विकासासाठी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Home राजकीय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली घटे यांच्या प्रचारार्थ...




