गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
तालुक्यातील नांदिखेडा (तिष्टी खु) गट ग्रामपंचायत येथील पाणीटंचाई च्या समस्येला “इंडिया लाईव्ह तेज न्युज”मध्ये दिनांक २१ मार्च २०२५ ला”नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार” या मथळ्याखाली बातमी व दिनांक २२ मार्च २०२५ ला “नांदिखेडा (तिष्टी खु) येथील सरपंच म्हणते आजपासून काम सुरू करतो आणि ग्रामसेवक म्हणते सरपंचाचे मत घ्या ?” या मथळ्याखाली दोन दिवस बातमी लावून धरल्यामुळे आले पाणी टंचाईच्या समस्येला यश काल दिनांक २३मार्च २०२५ ला ग्रामपंचायत मार्फत बोर मारून तात्काळ पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आली आहेत.
त्याबद्दल दिनांक.२१मार्च२०२५ रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथील गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक धोटे यांना निवेदन देऊन पाणी टंचाईवर तात्काळ निराकारण करण्यासाठी 15वा वित्त आयोगाच्या निधीतून पानी टंचाईच्या कामासाठी प्रस्ताव मंजुर करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सदस्य मनोज मांडवगडे,चक्कधर जीवतोडे,सौ.दुर्गाताई प्रेमराज नेहारे यांचेकडून करण्यात आली होती.
मात्र अजून पर्यंत पंचायत समिती कळमेश्वर अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये मूलभूत समस्याच्या अभावाला कारणीभूत असलेली अधिकारी वर्ग,सरपंच व त्याच्या जवडीक असलेली लोकांचा मनमानी कारभारावर कोणतीच ठोस पावले उचलून अंकुश अजून पर्यंत पंचायत समिती कळमेश्वर येथील गटविकास अधिकारी अंशूजा गराटे यांनी लावले नसल्याने अनेक गावांमध्ये मूलभूत समस्या जशाच्या तसेच असल्याची चर्चा कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे ?
Home कळमेश्वर तालुका विशेष पाणीटंचाईच्या समस्येला आले यश परंतु नागरिकांचे गटविकास अधिकाऱ्याच्या कारवाईवर “प्रश्नचिन्ह”



