दिनांक २० जुलै २०२५ रोजी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पत्रकारांची सभा घेण्यात आली.
या सभेत सर्वानुमते गुरुदेव वनदुधे यांची व्हाईस ऑफ मीडिया कुही तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष रमेश लांजेवार,कार्यध्यक्ष दिलीप चव्हाण, सचिव उल्हास मेश्राम, सहसचिव शरद सहारे, कोषाध्यक्ष अभीमन खराबे, सदस्य परसराम गोंडाणे व गजानन लांजेवार अशी कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
या वेळी सभेला व्हॉईस ऑफ मीडिया नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे सह जिल्हा सदस्य संजय टेंभेकर , संतोष धानोरकर,अनुप पठाणे हे उपस्थित होते.
या सभेला मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष घोरमारे म्हणाले की,व्हॉईस ऑफ मीडिया ही संपूर्ण भारतात ६५ हजार सक्रिय सदस्य असलेली एकमेव संघटना आहे.या संघटनेचे माध्यमातून गरजु पत्रकारांना घर,पेंशन,आरोग्य विमा,मुलांना उच्च शिक्षण करण्याकरिता मदत करण्यात येत तसेच मानधन हि देण्यात येते.




