मौदा (तालुका प्रतिनिधी)
खात जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील धनी येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावाला कचरा संकलन गाडीचे वितरण सोहळा जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं.स. सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, सरपंच दिवाकर नाटीये, माजी सरपंच अशोक बालकोठे, प्रभाकर राऊत, राजू सोनावणे, प्रफुल्ल शिंगाडे, सुनील नाटीये, दिलीप निंबाळकर, कैलास रंदई, राष्ट्रपाल ढोक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी जि.प. सदस्या राधा अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात गावाच्या स्वच्छतेसह सर्वांगीण विकासकामावर भर देण्याचे आवाहन केले. तर मुकेश अग्रवाल यांनी ग्रामपंचायतला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कचरा संकलन गाडी मिळाल्याने गावातील स्वच्छता मोहीमला बळ मिळणार असल्याचे सरपंच दिनकर नाटीये यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




