Home राजकीय सावनेर-कळमेश्वर तालुक्यात माफिया व अवैध धंद्यांविरोधातील नागरिकांचा संताप – नगरपरिषद निवडणुकीत निर्णायक...

सावनेर-कळमेश्वर तालुक्यात माफिया व अवैध धंद्यांविरोधातील नागरिकांचा संताप – नगरपरिषद निवडणुकीत निर्णायक ठरणार ?

68
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर विधानसभेतील सावनेर, कळमेश्वर, खापा आणि मोहपा या चार नगरपरिषदांमध्ये नागरिकांचे संतापाचे वातावरण वाढत आहे. सुनील केदार यांच्या कार्यकाळात वाळू माफिया व विविध अवैध धंद्यांचा वाढता प्रकोप नागरिकांना त्रस्त करीत आहे. यामुळे यापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नकार देत भारतीय जनता पक्षाच्या डॉ. आशिष देशमुख यांना विजय मिळाला होता.
परंतु,आता भाजपमध्येही वाळू माफियांचा आणि अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला राहिल्याचे आणि पक्षांतील आंतरिक बंडखोरी वाढल्याचे निरीक्षण नागरिकांमध्ये पायाला लागले आहे.
सर्वत्र नागरिक हे दोन्ही मुख्य पक्षांच्या “माफिया-प्रभावीत” धोरणांमुळे संतप्त झाले आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत या संतप्त मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
संपूर्ण तालुका पातळीवर हे निवडणुकीचे रणनितिक बदल आणि पक्षांतील बंडखोरीची घटना, स्थानिक राजकारणात मोठा धक्का ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here