गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेरमध्ये रेती माफिया व सट्टा माफियांच्या विरोधातील आपल्या भूमिकेला मतदारांनी कौल दिला; परंतु त्याच पक्षात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिला जात असल्याबद्दल आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. रेती-सट्टा धंद्यात गुंतलेले, महसूल बुडविणारे, महसुली अधिकाऱ्यांवर वाहनं चालविणारे लोक जर मंत्र्यांच्या छत्राखाली दिसत असतील, तर ते आम्हाला सहन होणार नाही, असा थेट सवाल त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर उपस्थित केला.
सावनेर पक्ष कार्यालय उद्घाटनावेळी आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी इशारा दिला की,अशा विवादित व्यक्तींची प्रवेश प्रक्रिया महसूल मंत्र्यांनी दोन दिवसांत रद्द करावी; अन्यथा येत्या बुधवारी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह छेडावा लागेल.
आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या तिखट भूमिकेनंतर पक्षात खळबळ उडाली. त्याच दिवशी जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी दोन्ही प्रवेश तत्काळ रद्द केल्याची घोषणा केली. या प्रवेशाबाबत महसूल मंत्री बावनकुळे व आमदार डॉ.आशिष देशमुख यांना काहीच माहिती नव्हती,असा खुलासा करत कुंभारे यांना सारवासारव करावी लागली.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.राजीव पोतदार, श्रीकांत देशपांडे,मनोहर कुंभारे,दादाराव मंगळे, रामराव मोवाडे, राजु घुगल आदी मान्यवर उपस्थित होते.
Home राजकीय पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रवेशावर आमदार डॉ.आशिष देशमुख संतप्त – दोन दिवसांत नियुक्ती...




