गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम अंतर्गत सामाजिक उपक्रम अंतर्गत विविध आजारमधे रोग्यांना रक्ताची गरज असते, ती भागवण्यासाठी संस्था दरवर्षी महाराष्ट्र सरकारला एक लाख (१०००००) रक्त बॉटल दान करत असते. त्या अंतर्गत आज दि.१०-०१-२०२५ रोजी कोहळी सेवाकेंद्रामध्ये कँपचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १२५ दात्यांनी रक्त दान करून सामाजिक दायित्व पूर्ण केले.यामधे कोहळी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोलजी भूरे, माजी सरपंच अशोकराव ठाकरे सेवाकेंद्र अध्यक्ष नामदेव उंबरकर इत्यादींनी रक्तदान केले व मोलाचे सहकार्य केले. तसेच कळमेश्वर तालुका अध्यक्ष श्रावणजी भालेराव सह मोहपा आणि पारडी येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी किसान दूध डेअरी कोहळी येथील इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष सुरेशराव घोंगे, सचिव विजयराव दैने यांचे विशेष सहकार्य मिळाले.




