Home प्रार्थना महोत्सव उद्याला सावंगी ताज आनंदाश्रम येथे प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळा

उद्याला सावंगी ताज आनंदाश्रम येथे प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळा

71
0

सावनेर :-
तालुक्यातील सावंगी तिर्थक्षेत्र असलेले ताज आनंदाश्रम येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही मकर संक्रमणाच्या शुभपर्वावर 14 जानेवारी रोजी महोत्सव व जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्रम्हलीन परम पुज्य भैय्याजी महाराज (श्री. ताज आनंदाश्रम सावंगी) विरचित “अध्यात्मपर प्रार्थना स्त्रोत्रावर” डॉ.जयंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून पुण्यलाभ घेण्याची विनंती आश्रमाचे संचालक शालीनीताई बुधोलिया तसेच वृषाली निर्मलजी मुद्रगल (अध्यक्ष) यांनी केली आहे.सावंगी हे गाव सावनेर तिष्टी काटोल मार्गावर असून या कार्यक्रमासाठी नागपूर काटोल व सावनेर बस स्थानकावरून विशेष बस सेवा उपलब्ध राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here