Home शैक्षणिक प्लॅनेट आयटीमध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 

प्लॅनेट आयटीमध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 

128
0

मनोहर घोळसे
सावनेर ता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त स्थानिक प्लॅनेट आयटी केंद्रातील सारथींच्या विद्यार्थ्यांकडून बालिका दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच मुलींना स्वालंबी जीवन जगता यावे यासाठी कौशल्य विकास शिक्षणासाठी प्रोत्साहित करने आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरविने काळाची गरज असल्याचे मत विविध विद्यार्थिनींनी आपल्या भाषणात व्यक्त केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुप्रिया चांदेकर,नेहा ढवंगळे, प्रचिता सायरे,नम्रता पिंपळे,हर्ष पाटील,तुषार बिसेन, देविका चीपडे, वेदांती चरपे,संजना वाडबुढे,ईश्वरी लोडेकर, भाग्यश्री चाफेकर,नताशा देशमुख,काजल गहरवार,नम्रता घ्यार,यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन हर्ष पाटील यांनी केले  प्लॅनेट आयटीचे समन्वयक गीता गुप्ता हिने आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here