Home जलसाक्षरता अभियान सावनेरात जलसाक्षरतेबाबत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण

सावनेरात जलसाक्षरतेबाबत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण

73
0

मनोहर घोळसे
सावनेर ता.महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील भागधारकांसाठी जलसाक्षरता विषयक दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला.गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुळकर यांच्या मार्गदर्शनात सद्भभावना ग्रामीण विकास संस्था वर्धा व पंचायत समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने  तालुक्यातील ग्रामपंचायत नांदागोमुख,बडेगाव व पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जलसाक्षरता अभियानाचे महत्त्व,  योजनेतील नियमित संचालन,देखभाल व दुरुस्ती, जलजीवन मिशन योजना,पाणीपुरवठा योजनेमधील आवहाने आणि त्यावरील उपाययोजना,माझ्या गावाचे पेयजल अंदाजपत्रक,नळ पाणीपुरवठा योजनांचे हस्तांतरण प्रक्रिया व बहिर्गमन,पाणीपट्टीचे महत्व,माझे पाणी माझी जबाबदारी नळ पाणीपुरवठा योजनांचे सनियंत्रण व सह नियंत्रणाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत व ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या भूमिका,जबाबदारी,जल व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे आधी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी सुनील गजभिये,वसंता वराडे, रवींद्र पाटील,आनंद पवार,अंकुश बुरांगे,नलिनी शिरपुरे,लीना तुरकी आदींनी प्रशिक्षण दिले तर प्रशिक्षणाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,जलसुरक्षक,पंचायत समितीचे गट समन्वयक प्रदीप बागडे,विस्तार अधिकारी दिलीप टेंभेकर,उत्तम बलवीर तसेच ग्रामपंचायत अधिकारी नारायण पटाळे,जिवारे आदिंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here