Home अभ्यास दौरा स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ येथे जागतिक स्कार्फ दिन साजरा

स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ येथे जागतिक स्कार्फ दिन साजरा

50
0

स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ येथे जागतिक स्कार्फ दिन साजरा

दि.०१/०८/२०२६ स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ,ता.जि. यवतमाळ येथे स्काऊट-गाईड विभागातर्फे जागतिक स्कार्फ दिन तथा जागतिक स्काऊट सनराईज डे अंतर्गत विविध उपक्रमाने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम स्काऊट पथकातील लिडर यांच्या कडून स्काऊट-गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट आणि गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्काऊट-गाईड भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.यानिमित भावि पिढीसाठी उपयुक्त स्काऊट-गाईड वचनाचे पूनरोच्चार करून स्काऊट कर्तव्याचे स्मरण करण्यात आले.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार “एक पेड माँ के नाम” उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करून वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रिना काळे, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा संघटक(स्काऊट)श्री. गजानन गायकवाड, ज्येष्ठ स्काऊटर श्री. नागोराव काकपूरे, उपमुख्याध्यापिका जागृती गंडेचा उपस्थितीत होते.
गजानन गायकवाड यांनी – जागतिक स्कार्फ दिन तथा स्काऊट सनराईज डे दिनविशेषविषयी महत्व सांगून स्काऊट-गाईड यांना इतरांची मदत करून राष्ट्रकार्यात मदत करण्याचे आवाहन केले. तर नागोराव काकपूरे यांनी स्काऊट-गाईड यांना स्कार्फ परिधान करणे, सत्कृत्य करणे याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे युनिट लिडर श्री. संजय कोल्हे,श्री. पंकज शेलोटकर,श्रीमती. रोशना घुरडे आणि कब बूलबूल यूनिट लिडर हर्षा र्ईगळे, महेश गहूकार तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. अभिजित पवार व्हाईस ऑफ मिडिया न्यूज नेटवर्क यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here