Home जागरुकता लोहगडमध्ये नशामुक्तीचा जागर – विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

लोहगडमध्ये नशामुक्तीचा जागर – विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

60
0

गिरीश आंदे
नरेंद्र हायस्कूल लोहगड व जिल्हा परिषद शाळा लोहगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, सावनेर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी ब्रह्मकुमारी सुरेखा दीदी व अनिल सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञाही घेतली.
कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक राठोड सर व गावत्रे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोनबले सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टेंबे सर, निघोट सर, ढाले मॅडम, महाजन मॅडम व अंजली मॅडम यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here