Home सामाजिक ग्राहकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव असावी – तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर

ग्राहकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव असावी – तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर

64
0

मौदा :-
स्वतःची फजगत होऊ नये म्हणून जागरूक ग्राहक या नात्याने त्याला त्याच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव असावी, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने ग्राहक राजा ठरेल असे प्रतिपादन मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी केले.जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून मौदा तहसील अंतर्गत अन्न पुरवठा विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन दि. १७ मार्च रोजी तहसील कार्यालयात करण्यात आले त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन पर बोलत होते. दरम्यान इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्यासह नायब तहसीलदार योगिता दराडे, नायब तहसीलदार एस.आर. गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश ठवकर, अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी शालिनी बारस्कर, अन्न पुरवठा संघटनेचे अध्यक्ष अशोक वासनिक, अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे, संघटनमंत्री डॉ. निलिमा घाटोळे, सेवानिवृत्त शिक्षिक तथा कार्यकर्ते दिनेश ढोबळे तसेच अधिकारी, कर्मचारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदार निंबाळकर पुढे म्हणाले जागतिक ग्राहक दिन हा दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. ग्राहक दिनाची संकल्पना अमेरिकेचे तत्कालिक राष्ट्रअध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी सर्वप्रथम मांडली. त्यांनी अमेरिकन संसदेमध्ये १५ मार्च १९६२ रोजी ग्राहक हक्कांबद्दल परखडपणे भाषण केले. त्यात त्यांनी ग्राहकांच्या महत्वाच्या हक्काबाबत उल्लेख केला. असे भाषण करणारे ते पहिलेच जागतिक नेते होते. यावरूनच पुढे
जागतिक पातळीवर साजरा करायचा निर्णय घेतला.
ग्राहकांचे हक्क : सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा मिळवण्याचा हक्क, निवडीचा हक्क, क्षातिपूर्तीचा हक्क,
ग्राहक शिक्षणाचा हक्क, पर्यावरण शिक्षणाचा हक्क,जागतिक ग्राहक हक्क दिनाची २०२५ ची थीम (घोषवाक्य) ही शाश्वत जीवनशैली न्याय संक्रमण अशी आहे. ही थीम निरोगी जीवनशैली सर्व ग्राहकांसाठी सुलभ, सर्वत्र उपलब्ध सुलभ आणि परवडणाऱ्या गरजांवर प्रकाश टाकते. ज्यामुळे लोकांच्या मूलभूत गरजा आणि हक्कांचे पालन होईल. शाश्वत जीवनशैलीची गरज ह्या साठी आहे की, वाढत्या पर्यावरणीय समस्येमुळे शाश्वत जीवनशैली स्वीकारणे अपरिहार्य झाले आहे. यामध्ये ऊर्जा बचत, ऊर्जेचा पुनर्वापर, आणि पर्यावरणपूरक उत्पादने वापरणे ह्यांचा समावेश होतो. न्याय संक्रमण म्हणजे सर्व घटकांना शाश्वत जीवनशैली कडे वळण्याची संधी मिळावी, यासाठी न्याय संक्रमण आवश्यक आहे. यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अडचणीचा विचार करून उपाययोजना केल्या जातात.
ह्या सर्व प्रक्रियेत ग्राहकांची भूमिका महत्वाची ठरतेय.
ग्राहकांनी त्यांच्या खरेदी निर्णयात पर्यावरण पूरक गोष्टींचा विचार करावा, पुनर्वापर योग्य, ऊर्जा कार्यक्षम आणि कमी प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे. आणि स्वतः बरोबर इतरांनाही शाश्वत जीवनशैली विषयी मार्गदर्शन करावे. तरच खऱ्या अर्थाने जागतिक ग्राहक दिन साजरा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here