Home Breaking News कळमेश्वर–ब्राम्हणी आणि मोहप्यात सत्तेचा महासंग्राम ! २१ डिसेंबरला कोणाचा झेंडा फडकणार ?

कळमेश्वर–ब्राम्हणी आणि मोहप्यात सत्तेचा महासंग्राम ! २१ डिसेंबरला कोणाचा झेंडा फडकणार ?

67
0

कळमेश्वर
कळमेश्वर–ब्राम्हणी आणि मोहपा नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता मतदान शांततेत पार पडले. आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कळमेश्वर–ब्राम्हणी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अविनाश माकोडे, काँग्रेसच्या ज्योत्स्ना मंडपे, बहुजन समाज पार्टीचे सुरेश डोंगरे, प्रहार संघटनेचे सुधीर केळझरे, उद्धवसेनेचे राहुल हिवराळे, शिंदेसेनेचे बिरजू रघुवंशी हे प्रमुख उमेदवार आहेत. तसेच रामनाथ बैरीसाल, राहुल खडसे, भीमराव निकोसे व सोनाली गोंडाने हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान,मोहपा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी उद्धवसेनेचे विजय वानखेडे, भाजपचे प्रवीण श्रोते, काँग्रेसचे माधव चर्जन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे हरिओम नेरकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने श्रीकांत येनूरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.
दोन्ही नगरपरिषदांमध्ये प्रचाराच्या काळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, करप्रणाली आणि स्थानिक विकासाचे मुद्दे गाजले. मतदानाची टक्केवारी समाधानकारक असून अपक्ष उमेदवारांची भूमिका निकालात महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
आता २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळमेश्वर–ब्राम्हणी व मोहपा नगरपरिषदांतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here