गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
दिनांक २१ डिसेंबर २०२५ नुकत्याच पार पडलेल्या कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्भेळ यश संपादन करत आपला गड राखला आहे. या निवडणुकीत नवनियुक्त नगराध्यक्ष अविनाश हिरालालजी माकोडे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण १५ सहकाऱ्यांनी (नगरसेवकांनी) दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला आहे. या विजयामुळे कळमेश्वर शहरात विकासाची लाट अधिक गतिमान होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास असल्याचे बोलले जात आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ. राजीव पोतदार यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
“हा विजय म्हणजे कळमेश्वरच्या जागरूक जनतेने विकासाच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार डॉ आशिष देशमुख आणि माझ्या नेतृत्वावर दाखवलेला अढळ विश्वास आहे. अविनाश माकोडे आणि त्यांच्या १५ नगरसेवकांच्या जोमाने शहराच्या सर्वांगीण विकासाला आता अधिक गती मिळेल. आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा चमू कटिबद्ध राहील.”
कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि गुलालाची उधळण निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत प्रचंड जल्लोष साजरा केला. “भारतीय जनता पक्ष विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
“हा विजय कळमेश्वरच्या प्रत्येक नागरिकाचा आणि अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. जनतेने दिलेल्या या जबाबदारीची आम्ही जाणीव ठेवू आणि शहराच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करू.”या विजयाबद्दल सर्व कार्यकर्त्यांना जनतेचे खूप खूप अभिनंदन डॉ.राजीव पोतदार(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य) यांनी केले आहे.




