मौदा (तालुका प्रतिनिधी)
मौदा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसन्ना (राजा) तिडके यांनी नगराध्यक्षपदावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांना ५१४२ मते मिळाली, तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी राजेश चुडामन निनावे यांना ४२३८ मते मिळाली. तब्बल ९०४ मतांच्या फरकाने तिडके यांचा दणदणीत विजय झाला.
मात्र, नगरसेवकांच्या बाबतीत चित्र उलटे आहे. एकूण १७ नगरसेवकांपैकी काँग्रेसचे ११, भाजपचे ४ आणि अपक्ष २ नगरसेवक निवडून आले. यामुळे भाजपला नगराध्यक्षपद मिळाले तरी सभागृहात बहुमत नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही परिस्थिती ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी निर्माण झाली आहे.
मतमोजणी मौदा नगरपंचायत सभागृहात शांततेत पार पडली. अतिशय चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली.
निवडून आलेले नगरसेवक आणि त्यांचे पक्ष
रंजवीता जितेश गजभिये (काँग्रेस)
पद्मावती जॉनी चालसनी (भाजप)
प्रियंका सचिन कळमेख (काँग्रेस)
उमेश रुपराव गभाने (अपक्ष)
दिपिका चंद्रकांत पोटभरे (अपक्ष)
दामिनी विक्की साठवणे (काँग्रेस)
शरद सुधाकर सावंग (काँग्रेस)
कल्पना राजेंद्र बारई (काँग्रेस)
शुभम रमेश तिघरे (काँग्रेस)
आशिष किशोर काटकर (काँग्रेस)
रमेश कवडू कुंभालकर (भाजप)
राजकुमार किसन सोमनाथे (भाजप)
रंजना भाऊराव धनजोडे (काँग्रेस)
मोरेश्वर टेनिचंद सोरते (भाजप)
अनिता दशरथ भंडारी (काँग्रेस)
दिपक तुळशीराम कुमरे (काँग्रेस)
तरकेश्वरी ताराचंद बारापत्रे (काँग्रेस) या निकालामुळे मौदा नगरपंचायतीत पुढील काळात राजकीय समीकरणे कशी रंगणार, याकडे लक्ष लागले आहे.
विजय उमेदवारांनी विजय रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी काम पाहिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Home राजकीय मौदा नगरपंचायत निवडणूक भाजपला नगराध्यक्षपद,काँग्रेसला नगरसेवकांत बहुमत – दोन्ही पक्षांत ‘थोडी खुशी,...




