Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर अध्यक्ष गोपाल घटे यांच्या नेतृत्वाखाली...

सावनेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर अध्यक्ष गोपाल घटे यांच्या नेतृत्वाखाली माता खेडी मजीद येथे रमजान ईद साजरी

21
0

गिरीश आंदे
रमजान ईदच्या पावन पर्वानिमित्त सावनेर शहरातील माता खेडी मजीद येथे आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने मुस्लिम बांधवांचा शाल,टोपी व हार देऊन उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून सर्वधर्म समभाव, सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत समाजात शांतता, सद्भावना व प्रगती नांदो,अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी सावनेर शहर अध्यक्ष गोपाल घटे,सुरेंद्र वानखेडे,प्रशांत ठाकरे,राजू वाघाडे,गणपती पठाणे,सोनबा ठाकरे,भगवान रायकवाड,अमोल डहाट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे विविध समाजघटकांमध्ये सलोखा दृढ होण्यास हातभार लागेल,असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here