Home Breaking News कळमेश्वरात आरक्षणानंतर राजकीय भूकंपाची चिन्हे ! काँग्रेस-भाजपमध्ये समीकरणे बदलण्यास सुरुवात ?

कळमेश्वरात आरक्षणानंतर राजकीय भूकंपाची चिन्हे ! काँग्रेस-भाजपमध्ये समीकरणे बदलण्यास सुरुवात ?

92
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमेश्वर तालुक्यात आरक्षण सोडत पार पडली असून, या प्रक्रियेनंतर काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही जिल्हा परिषद व पंचायत समिती महिला व अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचे राजकीय गणित कोलमडले असून, नव्याने समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेसमध्ये एकाच जिल्हा परिषद साठी दोन ते तीन गट सक्रीय असून, गटबाजी उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहेत. तर भाजपमध्येही जुने आणि नविन कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे अनेकांची दिशा बदलली असून, काहींचा झुकाव दुसऱ्या पक्षाकडे होत असल्याच्या चर्चा गावा-गावातून बाहेर येऊ लागल्या आहेत.
सध्या तालुक्यात “या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात” अशी हालचाल सुरू असून, संभाव्य उमेदवार कोण? हा प्रश्न सध्या मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
जसे-जसे निवडणुकीची तारीख जाहीर होईल, तसे पक्षांत अंतर्गत गटबाजी, उमेदवारीवरून कुरघोडी, आणि नाराज पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीला सुरुवात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here