गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
विदर्भस्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या प्रेरणेतून आज तिष्टी (बूज), तिष्टी (खुर्द) आणि तेलगाव या तीन गावांतील युवकांनी एकत्र येऊन महासम्राट बळीराजा मिरवणुकीचे आयोजन केले.
ही मिरवणूक स्थानिक महासम्राट बळीराजा उत्सव समितीच्या वतीने पार पडली. या मिरवणुकीचे स्वागत तीनही गावांतील नागरिकांनी अत्यंत उत्साहात, पारंपरिक पद्धतीने केले. महिलांनी रांगोळी काढून, दीप प्रज्वलित करून व पूजन करून रथाचे स्वागत केले.
गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमळ व उर्जायुक्त प्रतिसादामुळे आयोजकांचा उत्साह तिगुणित झाला असून, अशा एकोप्याच्या व प्रेमभावनेच्या कार्यक्रमांनी सामाजिक सलोखा दृढ होतो, असा संदेश आयोजकांनी दिला आहे.
“सम्राट बळीराजा केवळ एक ऐतिहासिक प्रतीक नसून तो आपल्या एकतेचा, श्रमसंस्कृतीचा आणि आत्मसन्मानाचा सन्मान आहे,” असेही यावेळी बोलताना तरुणांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशानंतर आयोजकांनी इतर गावांनाही आवाहन केले की, “अशाप्रकारे प्रेम, स्नेह आणि जिव्हाळ्याचे नाते तयार करणाऱ्या मिरवणुकांचे आयोजन करून आपण समाजात एकतेचा संदेश द्यावा.”
Home Breaking News तिष्टी व तेलगावमध्ये महासम्राट बळीराजा रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद – तीन गावांतील नागरिकांचा...




