गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिवाळी सणाचे औचित्य साधून तसेच कार्तिक पौर्णिमेच्या शुभक्षणी, तेलगांव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गोंडुळे यांनी सर्व ग्रामवासीयांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
“दिवाळीचा प्रकाश आपल्या आयुष्यात आनंद, समाधान व समृद्धी घेऊन येवो. भाऊबीज म्हणजे भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी आपुलकी, प्रेम व नात्यांची जाणीव अधिक दृढ होते. तसेच कार्तिक पौर्णिमा ही धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या दिवशी नित्यनेमाने स्नान, दान व पुण्याचे विशेष महत्त्व आहे,” असे श्री. गोंडुळे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये नमूद केले.
या पवित्र सणांच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये एकता, बंधुता व सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा, हीच सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
Home Breaking News दिवाळी भाऊबीज व कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त संजय गोंडुळे यांच्याकडून ग्रामवासीयांना हार्दिक...




