विदर्भ स्तरीय महासम्राट बळीराजा सन्मान रथयात्रा अत्यंत भक्तीभावाने श्रद्धा, संस्कृती, सामाजिक ऐक्य, व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन दुसऱ्या टप्प्यात दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्व विदर्भातील शिवतीर्थ उमरी ता सावनेर येथून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पाच जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करून तेलकामठी तालुका कळमेश्वर येथे समारोप करण्यात आला. रथयात्रेचे प्रत्येक ठिकाणी विविध समाजातील लोकांकडून तसेच विविध संघटनांकडून हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी दिंडी, भजन, पालखी द्वारे सहभाग नोंदवला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले.
महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ द्वारा महासम्राट बळीराजा रथयात्रेचे शुभारंभ तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करून राष्ट्रीय प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज व इतर प्रबोधनकार यांच्या हस्ते झाले होते. पहिला टप्प्यात दि. 11 ते 14 ऑक्टोबर पर्यंत अमरावती, यवतमा़ळ, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यातून आयोजन केले होते, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सिंधू (शिव)संस्कृतीचा महानायक, रक्षक स्वामी तिन्ही जगाचा, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, विज्ञान,कला, संस्कृती, समृद्ध करणारा, प्रजाहितदक्ष, समतावादी, तत्वज्ञानी, न्यायी,महादानशूर, संविभागी,अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट आहे. ज्याचे संपूर्ण आशिया खंडावर साम्राज्य होते असा महासम्राट, ज्याची आजही “इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो” म्हणून समस्त भारतीय विविध सणाद्वारे सुमारे तीन हजार वर्षापासून आठवण करतात. अशा महासम्राटाची दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी सामूहिक पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक काढून बलिप्रतिपदा दिन साजरा करावा व नवीन पिढीला बळीराजाच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत व्हावी या हेतूने विविध संघटनांच्या सहकार्याने रथयात्रेचे आयोजन केले होते.
रथयात्रेमध्ये महासम्राट बळीराजाच्या मूर्तीचा रथ, जिजाऊ शिवबा मूर्तीचा रथ, झांकी, ढोल ताशा, पथनाट्य, गाण्यांचा कार्यक्रम हे यात्रेचे विशेष आकर्षण होते.
रथयात्रेसाठी सर्वश्री अभिविलास नखाते, ज्ञानेश्वर रक्षक, सेवकराम राऊत, रोशन उरकुडे, उमेश कोराम, विनोद मानकर, शुभम गजभिये, सुभाष खंगार, अंकुश वैद्य, बन्सीधर शहारे, सुधांशू मोहोड, योगराज धानोरकर, दिनेश इंगोले, नरेंद्र गद्रे, सुनिता नखाते, राजेश धोटे, प्रमोद वैद्य, भगवान चांदेकर, बबलू मेश्राम, सुजित मेश्राम, राजू पाटील, सचिन पराये, जितेंद्र पर्वते, प्रशांत येनगंदेवार, गिरीधर बोबडे, अभय महोतकर, सागर घुगसे, चंद्रशेखर ढोबळे, पंकज घाठोडे, संजय टेंभेकर, गिरीश आंदे, कांचन ढवंगडे, संजय ठाकरे अभिलाष खंडारे, वीरेंद्र कडू, दिनेश ठाकरे, गजानन इंगळे, सुनील पाथोडे, गोविंदराव भंडारकर, मोंटू पिलारे, बाळकृष्ण राऊत, संजय कुथे,प्रदीप उरकुडे, सुखदेव गोटे, जयंत झोडे, उद्धव मेहंदळे, सुरेश तरोणे, बाळकृष्ण परशुरामकर, जगदीश वाडीभस्मे, खेमेंद्र कटरे, संजय कानतोडे, श्रद्धा पुंडकर, सुप्रिया बल्की, वंदना बनकर, प्रभाकर किल्लारे, सुधाकर भर्रे, यशवंत कुथे, शांताराम जडते, सुनंदा दिवटे, संगीता टक्कामोरे इत्यादी विदर्भातील मान्यवरांनी रथयात्रेत सहभाग व सहकार्य केले.




