गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक 28 जुलै 2025 रोजी केटीएम सभागृह कळमेश्वर येथे माजी मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते.या प्रसंगी 25 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी आघाडीचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष व सदस्यत्व पदाचा राजीनामा देणारे मनोज मांडवगडे यांच्यासह विठोबा वंजारी,कैलास निकोसे, नामदेव वंजारी,कैलास राऊत, प्रभाकर कोल्हे सह अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी बाबाराव कोढे ,बाबा पाटील,अभय फुटाणे,नितीन राठी,वीरेंद्रसिंह भैस,विवेक मोहाडे,महेंद्र देशमुख,वासुदेव निंबाळकर,किशोर मोहोड,नरेंद्र पालटकर,आशिष देशमुख,देवेंद्र कोहळे,महेंद्र डोंगरे,श्रीराम काळे, अनिल डांगोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी कळमेश्वर तालुक्यातील नेते व अनेक कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आधीच तिकडून – ईकडे होणार असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.




