Home Breaking News तेलकामठी महसूल मंडळात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार श्यामकुमार बर्वे यांचे सक्रिय पावले...

तेलकामठी महसूल मंडळात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार श्यामकुमार बर्वे यांचे सक्रिय पावले ?

191
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी महसूल मंडळातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार श्री. श्यामकुमार बर्वे यांनी आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी शेतपातळीवर प्रत्यक्ष दौरा केला. पाहणी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी खासदार श्री. बर्वे म्हणाले की, “शेतकऱ्यांवर आलेले हे नैसर्गिक संकट गंभीर आहे. शासनाकडून पीकविमा, तातडीची नुकसानभरपाई व सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करणार आहे. एका ही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही.”महाराष्ट्र शासनाने जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी 31 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ₹2,215 कोटींची मदत प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट भरपाईसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. शासन तसेच नुकसानभरपाईसाठी पंचनाम्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून मदतीचे वितरण सुनिश्चित करत आहे. यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक आधार मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
सदर दौऱ्यात माजी मंत्री श्री. सुनील केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. बाबाराव पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री. बाबा कोढे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री. श्रावणदादा भिंगारे, कळमेश्वरचे तहसीलदार श्री. विकास बिक्कड, गटविकास अधिकारी सौ. अंशुजा गराटे, तालुका कृषी अधिकारी सौ. दीपाली कुंभार तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here