गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आणि नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख मा. उत्तम भाऊ कापसे व मा. मंगेश भाऊ गमे यांच्या सौजन्याने कळमेश्वर तालुक्यासाठी गोरगरिबांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे अनावरण 6 जून 2025 रोजी मंगेश भाऊ गमे यांचे जनसंपर्क कार्यालयाजवळ, तळ्याची पार,कळमेश्वर येथे सायंकाळी 6 वाजता करण्यात आली.ही सेवा गावातील गरजू,गरीब आणि संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी तात्काळ वैद्यकीय मदत पोहचवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.”रुग्णसेवा हीच खरी शिवसेवा” या भावनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधुकरजी दळवी , कळमेश्वर तालुका प्रमुख नंदकिशोर जाचक,सावनेर विधानसभा प्रमुख सुरेशजी लंगडे,उपशहर प्रमुख विलास बारमासे व गुड्डू भाऊ पठाण,ज्येष्ठ शिवसैनिक बाबारावजी गोतमारे,राजू बोरकर, प्रदीप कट्यारमल,कमलाकर मानकर , नागपूरचे आरोग्य दूत योगेश भाऊ नासरे,सावनेर युवासेना तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ कामोने,बजरंग दल सावनेर तालुका अध्यक्ष चेतन भाऊ हेलोंडे,अनुग्रह तिडके, विपुल गुंडगे, अजय हिवराळे, विकास बागडे, ललित डेहरिया, सतीश वानखेडे, सूरज पाटील, जॉन अली जाफरी व इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोफत सेवेचा लाभ तालुक्यातील प्रत्येक गरजवंत नागरिकाला होणार असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




