Home Breaking News तिरंगा आपल्या हृदयात,भारतमाता आपल्या श्वासात हाच आपल्या बाईक रॅलीच्या संदेश – आमदार...

तिरंगा आपल्या हृदयात,भारतमाता आपल्या श्वासात हाच आपल्या बाईक रॅलीच्या संदेश – आमदार डॉ.आशीष देशमुख

80
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी ८ वाजता पासुन कळमेश्वर मध्ये “हर घर तिरंगा बाईक रॅली” आमदार डॉ.आशीष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती.हि बाईक रॅली पंचायत समिती कळमेश्वर पासुन सुरु करूण बस स्टॉप-जोड मारोती चौक – झेंडा चौक – बाजार चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा -शिवाजी महाराज पुतळा – तळयाची पार येथे समाप्ती करण्यात आली.
हि बाईक रॅली अफाट उत्साहात व अभूतपूर्व जन सहभागाने पार पडली. तिरंगा हातात घेऊन निघालेल्या शेकडो देशभक्तांनी प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली देशभक्तीच्या घोषणांना केल्याने दुमदुमली होती.
या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.राजीव पोतदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे,रामराव मोवाडे,मीना तायवाडे,धनराज देवके,उपविभागीय अधिकारी संपत खलाटे,गट विकास अधिकारी कळमेश्वर अंशुजा गराटे,तहसीलदार कळमेश्वर विकास बिक्कड,प्रतीक कोल्हे,प्रमोद हत्ती,शैलेंद्र अस्वले,स्वप्नील चौधरी,मनीषा लंगडे,रंजना देशमुख,कांचन आंबूलकर,रुपाली चिमुरकर,छाया पडोळे,वैशाली बोडखे,जया पवार,शीतल सातपुते,योगिता धारपुरे,आरती तारखेडे,अरुणा मंडलिक,विशाखा गमे,नीलिमा धनगरे,विद्या शेवाळे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here