Home Breaking News सावनेर विधानसभा क्षेत्रात नगरपरिषद मधील भाजपाच्या अंतर्गत गटबाजीवर मतदारांचा डोळा ?

सावनेर विधानसभा क्षेत्रात नगरपरिषद मधील भाजपाच्या अंतर्गत गटबाजीवर मतदारांचा डोळा ?

99
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर विधानसभा क्षेत्रातील आगामी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना,भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक वातावरणात अंतर्गत चढाओढीचे सावट स्पष्टपणे जाणवू लागले आहे.
दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याने या स्पर्धेची झलक उघड केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मात्र,या मेळाव्यात अनेक जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यांच्या जागी अनेक नव्या चेहऱ्यांना मंचावर स्थान मिळाल्याने,पक्षांतर्गत सत्तांतराचे संकेत दिसून आले.
राजकीय निरीक्षकांच्या मते, भाजपमध्ये सध्या ‘जुना गट विरुद्ध नवा गट’ अशी स्पष्ट विभागणी दिसू लागली आहे. संघटनात्मक बदल आणि नव्या नेतृत्वाचा उदय हा पक्षासाठी ताजेपणा घेऊन आला असला, तरी जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे प्रतिबिंब आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, भाजपमधील ही अंतर्गत चढाओढ आता पक्षाच्या पलीकडे जाऊन मतदारांमध्येही चर्चेचा विषय बनली आहे. कळमेश्वर, मोहपा, सावनेर आणि खापा नगरपरिषदांच्या प्रभागांत मतदार “कोणता गट वरचढ ठरेल?” या चर्चेत गुंतले आहेत.
राजकीय वर्तुळात असा अंदाज वर्तवला जात आहे की, भाजपच्या या गटबाजीचा परिणाम उमेदवार निवड प्रक्रियेपासून ते मतदारांच्या अंतिम निर्णयापर्यंत जाणवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here