सावनेर
दिनांक 1 ऑगस्ट 2025 ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर तर्फे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी राजू वानखेडे तर मार्गदर्शक म्हणून महा. अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष सेवकराम राऊत विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मल्यारपण करून झाली. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी बोलताना सावनेर शाखेचे अध्यक्ष संदीप भोंगाडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर ढोबळे, प्रधान सचिव नरेंद्र पाटील त्यांच्या जीवनपटातील अनेक घटना आणि चळवळीतील त्यांचे जीवन यावर प्रकाश टाकला.
तसेच महा. अनिस नागपूरचे युवा कार्यवाह मनीषकुमार अडागळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण साहित्य प्रवासाबद्दल माहिती सांगितली. त्यांनी लहानपणापासून जगत आलेले जीवन आणि त्यातून निर्माण झालेले आणि समाजाची वास्तविकता सांगणारे साहित्य निर्मिती त्याबद्दल आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक सेवकराम राऊत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतील त्यांचा सहभाग आणि लालबावटा पथक याबद्दल विस्तार पूर्वक माहिती दिली. जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेले त्यांचे साहित्य कसे सर्वव्यापी आहे याबद्दल आपले मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले राजू वानखेडे सर यांनी प्रत्येक महापुरुषांना एखाद्या मर्यादित समाजापुरता संकुचित न ठेवता त्यांच्याविषयी विस्तारितपणे समाजात सांगण्याची आपल्यालाच गरज आहे असे पटवून दिले. तसेच महापुरुषांचे विचार हे पुस्तकांच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन सावनेर शाखेच्या कार्याध्यक्ष मनीषा साखरे यांनी केले तर आभार हे निखिल पुरी यांनी केले. कार्यक्रमाला विनोद तांदूळकर,गजेंद्र चवडे,तेजस वानखेडे, संगीता वाघमारे, मनीषा वानखेडे, वत्सला वानखेडे, मृणाली पाटील, प्रणाली पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अंधश्रद्धा जनजागृती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर तर्फे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...




