सावनेर
दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी खापा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध शासकीय योजना, समस्या व तक्रारींचे एकाच ठिकाणी निराकरण करण्यात आले. लोकाभिमुख शासनाची ही संकल्पना अधिक परिणामकारक ठरत असल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. समाजहिताचे कार्य अधिक गतीमान करण्याची प्रेरणा या शिबिरातून लाभल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख,प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव पोतदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे,विजय देशमुख,पियुष बुरडे,चंद्रकांत लांडे,अशोक तांदूळकर,रामराव मोवाडे,प्रफुल मोहटे,रवी खुबाळकर,दिगंबर सुरतकर,अंकुश देशमुख,विलास ठाकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी संपत खलाटे (उपविभागीय अधिकारी),सागर खर्डे (उपविभागीय पोलीस अधिकारी),मनोजकुमार हिरुडकर (गट विकास अधिकारी),अक्षय पोयम (तहसीलदार सावनेर) आणि श्री. विकास बिक्कड (तहसीलदार कळमेश्वर) यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उपस्थित मान्यवरांनी या शिबिराचे कौतुक करत भविष्यकाळात देखील अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.




