Home Breaking News महावितरणच्या निष्काळजीपणाने शेतकरी होरपळला! हाय व्होल्टेज लाईनमुळे उसाचे पीक जळून खाक –...

महावितरणच्या निष्काळजीपणाने शेतकरी होरपळला! हाय व्होल्टेज लाईनमुळे उसाचे पीक जळून खाक – बाळकृष्ण बले यांचे मोठे नुकसान

71
0

कृणाल सातपुते (सावनेर तालुका प्रतिनिधी)
सावनेर तालुक्यातील गुजरखेडी येथील शेतकरी बाळकृष्ण पुरुषोत्तम बले यांच्या शेतातील उसाचे पीक महावितरणच्या अल्गरजीपणामुळे आगीत जळून खाक झाले.
हाय व्होल्टेज वीज वाहिनीतून झालेल्या स्पार्किंगमुळे ही आग लागल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी पाण्याने व माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर संपूर्ण उसाचे पीक राख झाले होते. या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, पीडित शेतकऱ्याने महावितरण विभागाकडून तत्काळ पंचनामा व नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी असा आरोप केला आहे की, विजेच्या तारा व खांबांची देखभाल व तपासणी नियमित न झाल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here