Home Breaking News मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

70
0

गिरीश आंदे
मानकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वरोडा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता प्रभात फेरीने झाली. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी ग्रामस्थांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
यानंतर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. आदरणीय माजी सैनिक लेकुरवाळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बारई सर, माजी मुख्याध्यापक तसेच विजयजी नागपुरे, पत्रकार लोकमत वर्तमानपत्र आणि अरविंदजी ढोले, पत्रकार, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जया मानकर यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेचा आगामी अजेंडा व विविध उपक्रमांची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.
गांधी शिक्षण संस्थेच्या सचिव प्रिया मानकर यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायतीने उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे रोमांचक प्रात्यक्षिक सादर करून आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले.
शाळेतील मल्टी सेक्टर लॅबचे प्रदर्शन देखील पाहुणे, पालक व ग्रामस्थांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम व तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक साधनांची माहिती उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजेश चौधरी यांनी केले, तर नामदेव पटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह, पालक व ग्रामस्थांची उपस्थिती आणि देशभक्तीपूर्ण वातावरण यामुळे मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here