Home Breaking News सावनेर पोलिसांच्या पुढाकारातून ‘लाल विधानाला उत्तर ! संविधान’ नाटकाचा प्रभावी प्रयोग

सावनेर पोलिसांच्या पुढाकारातून ‘लाल विधानाला उत्तर ! संविधान’ नाटकाचा प्रभावी प्रयोग

2
0

गिरीश आंदे
सावनेर संविधानाचे महत्त्व, भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने सावनेर पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (दि. १०) प्रसंग सेलिब्रेशन लॉन येथे ‘लाल विधानाला उत्तर ! संविधान’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. हेमेंदू रंगभूमी, नागपूर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या मोफत नाट्यप्रयोगाला हजारावर प्रेक्षकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या नाटकातून संविधानाचे महत्त्व, सामाजिक विचार आणि लोकशाही मूल्ये प्रभावीपणे मांडण्यात आली. नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत संविधानविषयक विचार पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेमेंदू रंगभूमीचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र नाईकवाडे आणि प्रा. सुभाष वहोकर यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव यांचा सन्मान केला.
कार्यक्रमादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महत्त्वपूर्ण विचार मांडले. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, एपीके फाइल्स, डिजिटल अरेस्ट, लोन व गेमिंग अॅप्स तसेच सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आणि अनोळखी लिंक अथवा संशयास्पद अॅप्सपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस उपनिरीक्षक उमेश मेश्राम, मंदाले, एपीआय कानगुले, एएसआय सुभाष रुडे, पीएसआय दीपक निंबाळकर, पीएसआय बाळू राठोड, खुफिया प्रमुख सुनील तलमले, पोलिस हवालदार भावेश शेंडे व नंदू मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
नाट्यप्रयोगातील कलाकार व तंत्रज्ञ
नाटकाचे लेखन प्रवीण खापरे यांनी केले असून दिग्दर्शन टीम लाल विधानचे होते. तांत्रिक बाजू मनोज वासनिक, आनंद भोयर, हर्ष नागभिडे, गणेश लाकडे, कृष्णा म्हस्के, रिया गुप्ता व अजिंक्य थेर यांनी सांभाळली.
नाटकात जय भूते (मित्र), मयूर मस्के (मिलिंद), छकुली जाधव, गणेश लाकडे, कृष्णा म्हस्के (कॉमरेड), आकांक्षा भाके (क्रिस्टिना), भूषण सेलोटकर (सी-६० कमांडो), आनंद भोयर (राजा/गावकरी), रिया गुप्ता (गावकरी) आणि प्रवीण खापरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) यांनी भूमिका साकारल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here