Home कृषी शेतकऱ्यांना अटी-शर्तीविना सरसकट कर्जमुक्ती द्या – काँग्रेसची मागणी

शेतकऱ्यांना अटी-शर्तीविना सरसकट कर्जमुक्ती द्या – काँग्रेसची मागणी

2
0

गिरीश आंदे

राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेत घातलेल्या अटी-शर्ती रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी कळमेश्वर-ब्राह्मणी शहर काँग्रेस कमिटीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, विदर्भात २०१९ पासून सातत्याने दुष्काळ, अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, कर्जमुक्ती योजनेच्या नावाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने घातलेल्या विविध निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमुक्ती लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष बाबाराव कोढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील, उपाध्यक्ष आशिष देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती वैभव घोंगे, माजी उपसभापती नरेंद्र पालटकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय धोंगडी यांच्यासह किशोर मोहोड, विलास मानकर, अजय मुंडवाईक, श्रावण भिंगारे, प्रशांत निंबाळकर, नरेश गोतमारे, प्रशांत धरपाळ, नितीन काळबांडे, रणधीर सोनोने, चंद्रकांत घाडगे, अनुजा निंबाळकर, संगीता वासनिक, विजय ठाकरे, दिनेश जोशी, सत्यवान मेश्राम, सुनील श्रीखंडे, गजानन भिंगारे, प्रवीण राऊत, प्रज्वल तागडे व काशिराव भक्ते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here