Home कृषी तेलकामठीत तूर पिकावरील आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी विभागाद्वारे प्रशिक्षण

तेलकामठीत तूर पिकावरील आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी विभागाद्वारे प्रशिक्षण

2
0

गिरीश आंदे
आज दिनांक ३ जुलै २०२६ रोजी कृषी विभागाद्वारे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत मौजा तेलकामठी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर येथील समाज भवनात तूर पिकावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना तूर पिकाच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती देणे, उत्पादन व उत्पादकता वाढविणे तसेच शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विनोद खडसे (विस्तार कृषी विद्यावेत्ता,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,नागपूर) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तूर पिकाचे सुधारित वाण,योग्य बीजप्रक्रिया,संतुलित खत व्यवस्थापन,आंतरपीक पद्धती,तण नियंत्रण,कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन,हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी तसेच काढणीनंतरचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती दिली.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुरळकर उपस्थित होते.उपकृषी अधिकारी श्रीकांत मोरे यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना, फळबाग लागवड तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहल गिऱ्हे, मोनाली कुंभारे, युक्ता सरप, कृषीसखी माधुरी फलके तसेच गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना तूर पिकाच्या आधुनिक व शाश्वत उत्पादन तंत्रज्ञानाबाबत उपयुक्त माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here