Home जागरुकता *47 NCC महाराष्ट्र बटालियन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ यांच्या संयुक्त...

*47 NCC महाराष्ट्र बटालियन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने योग दिवस साजरा*

17
0

*47 NCC महाराष्ट्र बटालियन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने योग दिवस साजरा*

यवतमाळ येथील 47 एन. सी. सी. महाराष्ट्र बटालियन व महाराष्ट्र योग शिक्षक संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून 47 एन. सी. सी. महाराष्ट्र बटालियन यवतमाळ चे
कर्नल अनुप एस. नायर यांची प्रमुख उपस्थिती होती . तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघ चे डॉ.गणेश सव्वालाखे विदर्भ प्रदेश अध्यक्ष, डॉ बाबा कपिले उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा, अभिजीत पवार सचिव महाराष्ट्र योग शिक्षक संघ, नरेंद्र टाके संघटक महाराष्ट्र योग शिक्षक संघ, व प्रसिद्धी प्रमुख श्री संजय सावरकर यांच्या नेतृत्वाखाली योग दिवस साजरा करण्यात आला.
यामध्ये एन. सी. सी. स्टाफ, माजी सैनिक, एन. सी. सी. चे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याच्या हस्ते धन्वंतरी पूजन व ईशस्तवन करून करण्यात आली. यावेळी योग प्रशिक्षक डॉ गणेश सव्वालाखे क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट व अभिजीत पवार यांनी योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले, व उपस्थित असलेल्या प्रत्येक साधकांनी व एन. सी. सी. च्या मुलांनी प्रोटोकॉल नुसार योग प्रात्यक्षिक केले. त्यानंतर योगिक सूक्ष्म व्यायाम करून त्या सोबत त्याचे महत्त्व समजून सांगण्यात आले. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य टिकून रहावे या साठी अनुलोम विलोम, कपालभाती व भ्रामरी प्राणायाम करण्यात आले व ” निरोगी वृद्धत्वासाठी योग ” ही संकल्पना योग्य प्रकारे समजून सांगण्यात आली.
योग चा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने मुलांनी व उपस्थित लोक समुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्नल एस कुमार यांनी योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व योगसाधकानां दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबा कपिले उपाध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांनी केले व योग दिवसाचे महत्त्व, योगाचे फायदे सांगितले. एन. सी. सी. च्या सर्व ऑफीसर व कर्मचारी यांनी कार्यक्रमाची सर्व व्यवस्था सांभाळली. अशा प्रकारे “करो योग रहो निरोग” हे ध्येय बाळगत उत्साही वातावरणात योग दिनाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र योग शिक्षक संघ व 47 महाराष्ट्र NCC बटालियन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
*आपला*
प्रा. अभिजित दिलिप पवार
सचिव महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ
9371893219

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here