गिरीश आंदे
नागपूर
इंडिया लाईव्ह तेज न्यूज डिजिटल मीडियाच्या सहाय्यक संपादकपदी गोपाल दादा घटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे मुख्य संपादक दिलीप घोरमारे यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली.
डिजिटल माध्यमातील बातम्यांचे संकलन, संपादन, पडताळणी आणि प्रकाशनाशी संबंधित जबाबदाऱ्या गोपाल दादा घटे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत. संस्थेच्या संपादकीय धोरणानुसार त्यांनी या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनियुक्त सहाय्यक संपादक गोपाल दादा घटे म्हणाले, “इंडिया लाईव्ह तेज न्यूजच्या सहाय्यक संपादक पदाची जबाबदारी मिळाल्याचा मला आनंद आहे. सहाय्यक संपादक म्हणून इंडिया लाईव्ह तेज न्यूजच्या पुढील वाटचालीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.”
गोपाल दादा घटे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




