Home Breaking News पेंच व्याघ्र प्रक्लपातील वाघाबाबत आक्षेपार्ह रिल पोस्ट करणाऱ्याला नागपुर ग्रामीण पोलीस दलातर्फे...

पेंच व्याघ्र प्रक्लपातील वाघाबाबत आक्षेपार्ह रिल पोस्ट करणाऱ्याला नागपुर ग्रामीण पोलीस दलातर्फे नोटीस बजाविण्यात आली.

74
0

दिनांक ३०/१०/२०२५ रोजी इन्स्टाग्राम अकाउंट aikalaakari या वरून इन्स्टाग्राम वर एक व्यक्ती दारूची बाटली हातात घेवुन वाघाच्या डोक्यावरून हात फिरवितांना दिसतो अशी रिल पोस्ट केली होती. सदर व्हिडीओ हा खरा नसुन कृत्रिम बुध्दीमत्तेने तयार करण्यात आला होता. सदर रिल (व्हिडीओ) ही पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपुर याच्याशी संबधीत असुन अशा रिल मुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाची बदनामी होत असुन पर्यटकामध्ये चुकीचा संदेश जात आहे. ज्यामुळे सदर व्याघ्र प्रकल्पास भेट देणाऱ्या पर्यटाकमध्ये घट होण्याची शक्यत असुन प्रकल्पास अर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. सदर रिलमध्ये वन्यप्राणी विरोधात कृती दर्शविली जात असुन त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर प्रकरणाचे गांर्भिय लक्षात घेता मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शन सायबर पोलीस स्टेशन नागपुर नाग ग्रामीण यांनी सदर इन्स्टाग्राम अकाउंट धारक नामे राहुल रविंदर नंदा, र. सी गार्डन व्हीयु, फ्लॅट नंबर ०७, माळा क्रमांक ०१, १६ नंबर रोड सांताकुझा, पश्चिम मुंबई यांना कलम १६८ भारतीय नागरिक सुरक्षा संहीता अन्वये नोटीस बाजवली असुन सदर व्हिडीओ इन्स्टग्राम वरून डिलीट करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here